Nashik : राजापूरजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

accident,www.pudhari.news

नगरसूल (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येवला तालुक्यातील राजापूर येथे अलगट वस्तीजवळ दुचाकी आणि क्रेटा कार यांच्यात समोरासमोर जबर धडक होऊन पन्हाळसाठे येथील भीमा गंगाधर साळुंखे हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी येवला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

आमदार नरेंद्र दराडे हे येवल्याकडे जात असताना त्यांनी ही घटना पाहताच तत्काळ रुग्णवाहिका बोलावून घेतली. राजापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुटे यांनी घटनास्थळी येऊन जखमीस पुढील उपचारासाठी येवला येथे हलविले. घटनास्थळी रवींद्र अलगट, सुभाष वाघ, समाधान आव्हाड यांनी मदत केली. क्रेटा कार (एमएच ०४ केआर 5982) ही नांदगावकडून येवल्याकडे चालली होती. धडकेनंतर क्रेटाच्या पुढील भागाचा चक्काचुर झाला. येवल्याचे पोलिस मोरे यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

हेही वाचा :

The post Nashik : राजापूरजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी appeared first on पुढारी.