Nashik : शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडून ओव्हरहेड लाइनची दुरुस्ती व पावसाळा पूर्व कामे (सातपूर कॉलनी, कार्बन नाका ते गंगापूर धरण) केली जाणार असल्याने येत्या शनिवारी (दि.२९) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्याचबरोबर काही भागात वीजपूरवठाही खंडीत केला जाणार आहे.

गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील १३२ केव्ही सातपूर व महिंद्रा या दोन फिडरवरुन ३३ केव्ही एचटी वीज पुरवठा घेण्यात आलेला आहे. सदर पंपींग स्टेशनद्वारे महापालिकेच्या बारा बंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र यांना रॉ-वॉटरचा पुरवठा करण्यात येतो. महावितरण कंपनीकडून ओव्हरहेड लाईनची दुरुस्ती व पावसाळा पूर्व कामे करण्याकरिता तसेच मनपाचे मुकणे रॉ-वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड कार्यान्वित सबस्टेशन गोंदे येथून एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी ३३ केव्ही वीजपुरवठा आहे.

महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशनमध्ये महावितरण कंपनीस सबस्टेशनमधील दुरुस्ती कामे करण्याकरीता वीजपुरवठा बंद राहणार असल्याने संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच दि. रविवारी (दि.३०) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याबाबतची नोंद घेवून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

हेही वाचा : 

The post Nashik : शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद appeared first on पुढारी.