Nashik : समृद्धी महामार्गावर पुलावरील कठडा तोडून कार कोसळली, तीघे गंभीर

समृद्दी महामार्ग अपघात,www.pudhari.news

नाशिक(विंचुरीदळवी) पुढारी वृत्तसेवा

समृद्धी महामार्गावर रविवारी (दि. २५) दुपारी १ च्या सुमारास सिन्नरकडून घोटीच्या दिशेने जाणारी स्विफ्ट कार पांढुर्ली गावाजवळ पुलावरील कठडा तोडून थेट खाली कोसळून अपघात झाला. या अपघातात कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारी १ च्या सुमारास सिन्नर पोलिस ठाणे व सिन्नर टेप हद्दीत समृद्धी महामार्गावर सिन्नर- घोटी लेनवर पांढुर्ली गावाजवळ किलोमीटर ५९०.५ या ठिकाणी स्विफ्ट कार (एमएच ४३ बीयू ०१३२) ही सिन्नरकडून घोटी बाजूकडे जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही स्विफ्ट कार ही समृद्धी महामार्गाचा पुलावरील संरक्षण भिंतीला धडक देऊन उलटली. यात दोन्ही लेनच्यामध्ये आगासखिंड गावाकडे जाणाऱ्या पुलाखाली रस्त्यावर पडली.

या अपघातात स्विफ्ट कारमधील रमेश गोयल (५३), ओमिना रमेश गोयल (४८), दीक्षा रमेश गोयल (२३. सर्व रा. घनसोली) नवी मुंबई येथील असून ते या अपघातात गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या जखमींना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग रुग्णवाहिका भरवीर येथील एसएमबीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. अपघाताचा पोलिस हवालदार पी. एन. शिरोळे व पोलिस हवालदार जी. डी. परदेशी पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post Nashik : समृद्धी महामार्गावर पुलावरील कठडा तोडून कार कोसळली, तीघे गंभीर appeared first on पुढारी.