Nashik Crime : अट्टल चोरट्याकडून २३ मोबाइल जप्त

मोबाईल चोर,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोबाइल चोरीच्या वाढलेल्या प्रकारानंतर अंबड पोलिसांनी सापळा रचत पकडलेल्या संशयिताकडून दीड लाख रुपये किमतीचे एकूण २३ मोबाइल जप्त केले आहे. अटक केलेल्या संशयिताचे नाव अजय संजय डगळे (वय २४, रा. सरपंच ढाबाचे जवळ, पिंपळद) असे आहे.

अंबड ठाण्यात मोहम्मद ओबेद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते २५ डिसेंबरला रात्री ८.३० च्या सुमारास स्लाइड वेल कंपनीसमोरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांचा मोबाइल हिसकावून नेला होता. सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून अजय डगळे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीचे २३ मोबाइल जप्त केले. संशयित अजय याला पोलिसांनी बुधवारी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याची रवानगी मध्यवर्ती न्यायालयात केली.

हेही वाचा :

The post Nashik Crime : अट्टल चोरट्याकडून २३ मोबाइल जप्त appeared first on पुढारी.