
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील काठे गल्ली परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका टोळक्याने तीन वाहनांच्या काचा फाेडून दहशत करण्याचा प्रयत्न केला. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे भद्रकाली पाेलिसांनी तिघांना अटक केली आहे. मंदार पवार (२५, रा. तपाेवन लिंक राेड), विकी जावरे (२१, रा. आगरटाकळी), समीर पगारे (२५, रा. धम्मनगर, जुना कथडा) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत.
मंगळवारी (दि.३१) मध्यरात्री २ ते २.३० च्या सुमारास तिघांनी काठे गल्लीतील रवींद्र विद्यालयाजवळ चारचाकी वाहनांच्या काचा फोडून पळ काढला. बुधवारी सकाळी पाेलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून संशयितांची ओळख पटविली. त्यानंतर तिघांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेत अटक केली. प्राथमिक चौकशीत तिघांनी मद्यसेवन करून नशेत काचा फोडल्याची कबुली पोलिसांना दिली.
हेही वाचा :
- Bombay HC: उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्र्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका
- नगर : रोडरोमिओंविरोधात पोलिस अॅक्शन मोडवर…
- नगर : स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त
The post Nashik Crime : काठे गल्लीत वाहनांची तोडफोड, तिघांना अटक appeared first on पुढारी.