कारच्या काचा फोडणाऱ्या पाच संशयितांना पोलिसांचा दणका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंगापूर गावातील जकात नाका परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत माजविणाऱ्या संशयितांची गंगापूर पोलिसांनी चांगलीच नशा उतरवली. ताेडफाेड करणाऱ्या पाच जणांना गंगापूर गाव परिसरातून कान पकडून फिरविले. तसेच ‘कारच्या काचा फाेडणार का रे?’, ‘दहशत करणार का?’ ‘याच्यापुढे अशी चुकी करणार का,’ असे प्रश्न विचारले, त्यावर ‘नाही सर’ हे उत्तर मोठ्याने देत संशयितांनी …

The post कारच्या काचा फोडणाऱ्या पाच संशयितांना पोलिसांचा दणका appeared first on पुढारी.

Continue Reading कारच्या काचा फोडणाऱ्या पाच संशयितांना पोलिसांचा दणका

नाशिकमध्ये ध्रुवनगरला टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

सातपूर : पुढारी वृत्तसेवा- जुने नाशिक परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफाेड केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (दि. 4) मध्यरात्री ध्रुवनगरमधील खंडोबा मंदिर परिसरात टोळक्याने दगडफेक करत वाहनांच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. अशा वाढत्या घटनांमुळे वाहनांच्या सुरक्षिततेचा व सार्वजनिक शांततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ध्रुवनगर परिसरातील सुभाष जाधव यांच्या घरासमोरील पार्किंगमध्ये लावलेली स्विफ्ट कार (एमएच ०२ …

The post नाशिकमध्ये ध्रुवनगरला टोळक्याकडून वाहनांची तोडफोड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ध्रुवनगरला टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

Nashik : सात वर्षांत नाशिक शहरात वाहन तोडफोडीचे १५९ गुन्हे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रात्री-अपरात्री वाहनांची तोडफोड, जाळपोळ करण्याचे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत. जानेवारी २०१७ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये तोडफोड, जाळपोळ प्रकरणी १६० गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी ११६ गुन्ह्यांची उकल झाली असून, उर्वरित ४४ गुन्ह्यांमधील आरोपींची ओळख पटलेली नाही. शहरात सिडको परिसरात युवकाच्या खुनानंतर संतापात काही अल्पवयीन मुलांनी वाहनांची …

The post Nashik : सात वर्षांत नाशिक शहरात वाहन तोडफोडीचे १५९ गुन्हे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सात वर्षांत नाशिक शहरात वाहन तोडफोडीचे १५९ गुन्हे

नाशिक : जुन्या सिडकोत दहा ते बारा वाहनांची तोडफोड ; एक ताब्यात, दोघे फरार

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा जुने सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अचानक चौक, साईबाबा मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या परिसरात 10 ते 12 दुचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली असून या प्रकरणी अंबड पोलिसांनी रात्रीच एकाला ताब्यात घेतले आहे.  यात आणखी दोन जणांची नावे समोर आली असून पोलिस पथक त्यांच्या शोधार्थ रवाना झाले आहे. …

The post नाशिक : जुन्या सिडकोत दहा ते बारा वाहनांची तोडफोड ; एक ताब्यात, दोघे फरार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जुन्या सिडकोत दहा ते बारा वाहनांची तोडफोड ; एक ताब्यात, दोघे फरार

नाशिक क्राईम : वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर मोक्का प्रस्तावित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात गेल्या दहा दिवसांत तीन घटनांमध्ये गुन्हेगारांनी वाहनांची तोडफोड, जाळपोळ करीत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांचा धाक नसल्यागत गुन्हेगार सर्रास गुन्हे करीत असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, नाशिकरोड येथे तोडफोड करणाऱ्यांवर मोक्का कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. सोमवारी (दि.२४) विहितगावात पंधरा वाहनांची तोडफोड व जाळपोळीची …

The post नाशिक क्राईम : वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर मोक्का प्रस्तावित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर मोक्का प्रस्तावित

नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड 

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा सोमवारी पहाटे विहीतगाव येथे दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड करून जाळण्याची घटना घडली होती त्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त भुसारे यांची यांची उचलबांगडी केली होती. मात्र विहितगावच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा धोंगडे नगर परिसरात पुन्हा चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने नाशिक …

The post नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड 

नाशिक : सिडकोत पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा येथे गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. शुक्रवारी (दि. 26) रात्री 10.30 ते 11 च्या दरम्यान दोन दुचाकीवर आलेल्या आठ जणांच्या टोळक्याने सावतानगर ते पवननगर रस्त्यावर शिवीगाळ करीत वाहनांवर थेट कोयते मारत तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी चार विधिसंघर्षित बालकांसह सात जण ताब्यात घेतले …

The post नाशिक : सिडकोत पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोत पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ

Nashik Crime : काठे गल्लीत वाहनांची तोडफोड, तिघांना अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील काठे गल्ली परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका टोळक्याने तीन वाहनांच्या काचा फाेडून दहशत करण्याचा प्रयत्न केला. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे भद्रकाली पाेलिसांनी तिघांना अटक केली आहे. मंदार पवार (२५, रा. तपाेवन लिंक राेड), विकी जावरे (२१, रा. आगरटाकळी), समीर पगारे (२५, रा. धम्मनगर, जुना कथडा) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. मंगळवारी (दि.३१) …

The post Nashik Crime : काठे गल्लीत वाहनांची तोडफोड, तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : काठे गल्लीत वाहनांची तोडफोड, तिघांना अटक

Nashik : सातपूर कॉलनीत अज्ञात टवाळखोरांची दहशद, मध्यरात्री वाहनांची तोडफोड

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा सातपूरला अज्ञात टवाळखोरांनी धूमाकूळ घातला आहे. सातपूर कॉलनी मधील जिजामाता मनपा शाळा व मैदान परिसर लगत रस्त्याच्या कडेला घरासमोर पार्किंग केलेल्या तब्बल सात चारचाकी वाहनांची अज्ञात टवाळखोरांनी तोडफोड केली. याबाबत सविस्तर बातमी अशी की, बुधवार (दि.१८) मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास अज्ञातांनी परिसरात दहशत पसरविण्याच्या हेतूने सातपूर कॉलनी परिसरात …

The post Nashik : सातपूर कॉलनीत अज्ञात टवाळखोरांची दहशद, मध्यरात्री वाहनांची तोडफोड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सातपूर कॉलनीत अज्ञात टवाळखोरांची दहशद, मध्यरात्री वाहनांची तोडफोड