नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
येथे गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. शुक्रवारी (दि. 26) रात्री 10.30 ते 11 च्या दरम्यान दोन दुचाकीवर आलेल्या आठ जणांच्या टोळक्याने सावतानगर ते पवननगर रस्त्यावर शिवीगाळ करीत वाहनांवर थेट कोयते मारत तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी चार विधिसंघर्षित बालकांसह सात जण ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तीन कोयते जप्त केले आहेत. यात सातपैकी पाच जण शाळकरी विद्यार्थी आहेत. यातील एक मुलगा फरार झाला असून, त्याचा शोध घेतला जातो आहे.
हेही वाचा:
- नाशिक : जिल्हयातील धरणांच्या धरणांच्या घशाला कोरड
- समाजभान : गुण आणि यश
- सांगली : ना चारा ना पाणी; कुरण विकास क्षेत्र पडून
The post नाशिक : सिडकोत पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ appeared first on पुढारी.