Nashik Crime : भद्रकालीत घरफोडी करणारे दोघे गजाआड

घरफोडी करणारे गजाआड,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या दोघांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. इरफान ऊर्फ पथऱ्या शेरु सय्यद (२४, रा. नानावली) व सनी सोमनाथ दोडके (२०, रा. काझीगढी) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांनी दोन घरफोडीचे गुन्हे कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. राजेंद्र माळी यांच्या घरात ९ ते ११ जानेवारीदरम्यान, घरफोडी झाली होती. या गुन्ह्याचा तपास करताना भद्रकाली पोलिसांनी संशयित इरफान सय्यद यास पकडले.

सखोल चौकशीत सनी दोडके यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांनी दोन घरफोडींची कबुली दिली आहे. पोलिसांनी दोघांकडून सोन्याचे ५५ हजार रुपयांचे दागिने हस्तगत केले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार, दिलीप ठाकूर, सहायक पोलिस निरीक्षक किशोर खांडवी, अंमलदार रमेश कोळी, लक्ष्मण ठेपणे, श्यामकांत पाटील, सागर निकुंभ, धनंजय हासे, एम. व्ही. बोरसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

The post Nashik Crime : भद्रकालीत घरफोडी करणारे दोघे गजाआड appeared first on पुढारी.