Nashik Crime : गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह 

crime

नाशिक, सातपूर : पुढारी वृत्तसेवा

नाशिकच्या सातपूर परिसरातील विधाते गल्ली या ठिकाणी राहत्या घरात गळा चिरलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सातपूर पोलिसांना यांसदर्भात माहिती मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान हा खून आहे की आत्महत्या याबाबत चौकशी नंतरच निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी सनी बैग हे त्यांच्या परिवारासोबत सातपूर विधाते गल्ली येथे भाडेकरू म्हणून मध्य प्रदेश येथून रहावयास आले होते. मात्र आज (दि. 26) जून रोजी पहाटे सनी बैग यांना कामाला जायचे असल्याने त्यांना पहाटे 6 वाजेला त्यांच्या पत्नीने डबा करून दिला. ते कामाला गेले मात्र त्या नंतर गळा चिरलेल्या अवस्थेत त्यांच्या पत्नीचा मृतदेह घरात आढळून आला. नेमकं काय घडलं? हा खून आहे की आत्महत्या? त्यासंदर्भात सातपूर पोलिस शोेध घेत आहेत.

बैग हे एका खाजगी कंपनीत काम करतात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून हे परप्रांतीय कुटुंब असल्याचे समजत आहे. दरम्यान चौकशीसाठी तात्पुरत्या स्वरूपात काही तरुणांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post Nashik Crime : गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह  appeared first on पुढारी.