Nashik Crime : चोरीच्या दुचाकीवरून दागिने खेचणारे गजाआड

crime

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दुचाकी चोरी करून तिचा वापर जबरी चोरीच्या गुन्ह्यात करीत महिलांचे दागिने खेचून नेणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकने ताब्यात घेतले आहे. या दोघांकडून पोलिसांनी वाहन चोरीचा एक गुन्हा व जबरी चाेरीचे सात गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ओमकार नंदकिशोर बागोरे (२३, रा. अमृतधाम, पंचवटी) व मुसा अय्युब सय्यद (३६, रा. आडगाव) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस अंमलदार मुक्तार शेख यांना मिळालेल्या माहितीनुसार जबरी चोरी करणारे चोरटे अमृतधाम येथे येणार असल्याचे समजले होते. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांना दिली होती. त्यानुसार अंमलदार रवींद्र बागूल, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, आसिफ तांबोळी, नाझिमखान पठाण, प्रशांत मरकड, विशाल देवरे, मुक्तार शेख यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना पकडले. दोघांनी दिलेल्या कबुलीनुसार त्यांनी पंचवटी परिसरातून दुचाकी चोरी करून तिचा वापर इतर गुन्ह्यांत केला.

या संशयितांनी म्हसरूळ, आडगाव, मुंबई नाका, अंबड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सात जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडील इतर दोन दुचाकींचा तपास सुरू असून त्यांनी या दुचाकी कोणत्या परिसरातून चोरल्या याचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून २ लाख ९० हजार रुपयांच्या सोन्याच्या लगडी, १ लाख ३० हजार रुपयांच्या दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित मुसा सय्यद याच्याविरोधात याआधीही जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात समेार आले आहे.

हेही वाचा : 

 

The post Nashik Crime : चोरीच्या दुचाकीवरून दागिने खेचणारे गजाआड appeared first on पुढारी.