Nashik Crime : पेठ फाटा येथे रिक्षाचालकाला मारहाण

crime

नाशिक : मोकळ्या जागेत रिक्षा उभी करण्याच्या कारणावरून एका रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षाचालकाला मारहाण केल्याची घटना पेठरोडवर बुधवारी (दि. १२) सायंकाळी घडली. आकाश कैलास जाधव (२७, रा. फुलेनगर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित सागर ए. मुळे याने कुरापत काढून शिवीगाळ करीत मारहाण करून दुखापत केली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात सागरविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधातेनगर मार्गावर घरफोडी

रविशंकर मार्गावरील विधातेनगर येथे चोरट्याने घरफोडी करून १ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि चांदीची नाणे असा ऐवज लंपास केला. अवधेश रामसागर चौबे (५४, रा. विधातेनगर) यांच्या कार्यालयात ११ ते १२ एप्रिलदरम्यान घरफोडी झाली असून, त्यांनी या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल केली आहे.

शिखरेवाडीत महिलेचा विनयभंग

शिखरेवाडी परिसरात संशयित विजय देसाई (५८, रा. शिखरेवाडी) विरोधात परिसरातील महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयिताने बुधवारी (दि. १२) दुपारी 2.15 च्या सुमारास हातवारे करून विनयभंग केला. या प्रकरणी उपनगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

The post Nashik Crime : पेठ फाटा येथे रिक्षाचालकाला मारहाण appeared first on पुढारी.