Nashik Crime : वडाळागावात दोन गटात हाणामारी

crime

नाशिक : कुरापत काढून दोन गटांनी हाणामारी केल्याची घटना वडाळागावात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिरीन इसाक शेख (रा. सादीकनगर) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि.१२) सायंकाळी सहाच्या सुमारास वडाळागावातील मदिना नगर येथील प्लॉटवर गेले होते. त्यांच्या प्लॉटमधून शेजारील गोठ्यातील पाईपलाइन गेल्याने इसाक शेख यांनी पाईपलाइन काढण्यास सांगितली. त्याचा राग आल्याने संशयित आवेश कोकणी, गुलाम कोकणी, नुर कोकणी व इतर दोघांनी शेख दाम्पत्यास मारहाण करीत शिवीगाळ केली. तर गुलामगौस जलालुद्दीन कोकणी (५४) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित इसाक शेख, मोईन शेख व फरीद शेख यांनी कुरापत काढू नदांड्याने मारहाण केली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदिरानगर पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post Nashik Crime : वडाळागावात दोन गटात हाणामारी appeared first on पुढारी.