Nashik News : अवैध मद्यविक्रीत ४४ टक्के संशयितांची वाढ

मद्यविक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने एप्रिल ते सप्टेंबरअखेर १ हजार ३३१ गुन्हे दाखल केले आहेत. त्यात १ हजार १४५ संशयितांची धरपकड केली आहे. दरम्यान, मागील वर्षी याच कालावधीत विभागाने १ हजार १३६ गुन्हे दाखल करीत ७५८ संशयितांना पकडले हाेते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा अवैध मद्यविक्री प्रकरणी ४४ टक्के अधिक संशयितांना पकडले आहे. (Nashik News)

राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात नाकाबंदी, सापळे रचून, वाहन तपासणीतून अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यानुसार एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत एक हजार ३३१ गुन्हे दाखल करून त्यात तीन कोटी ७२ लाख ८८ हजार ४१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात ५० वाहनेही जप्त केली आहेत. तसेच एक हजार १४५ संशयितांना पकडले आहे. त्याचप्रमाणे एक हजार ५२ गुन्ह्यांमध्ये संशयितांची ओळख पटली असून, २७८ गुन्ह्यांमध्ये संशयित हाती लागले नाही. त्यामुळे बेवारस मुद्देमाल म्हणून मद्यसाठा जप्त केला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कारवाई परराज्यातील मद्यसाठ्यावर झाली आहे. परराज्यात तयार केलेला मात्र महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला मद्यसाठा वाहतूक व साठा करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे कारवाई केली जात आहे. त्यात परराज्यातील संशयितांची संख्याही लक्षणीय आहे.

विभागाची कारवाई (एप्रिल ते सप्टेंबरअखेर)

वर्ष — एकूण गुन्हे– वारस –बेवारस –जप्त मुद्देमाल — संशयित

२०२३ — १,३३१ — १,०५२ –२७८ –३,७२,८८,४१८ –१,१४५

२०२२ –१,१३६ — ६९१ —४४५ –२,८६,५८,६४० — ७५८

हेही वाचा :

The post Nashik News : अवैध मद्यविक्रीत ४४ टक्के संशयितांची वाढ appeared first on पुढारी.