Nashik News | सुधाकर बडगुजरांना हद्दपारीची नोटीस- ‘मविआ’चा थेट आयुक्तांना इशारा 

शिवसेना निवेदन www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना बजाविण्यात आलेली हद्दपारीची नोटीस त्वरित मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदनातून महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने दिला आहे.

सराईत गुन्हेगारांना हद्दपार केले जाते, मात्र बडगुजर हे लोकसेवक आहेत. त्यांच्याविरोधात राजकीय गुन्हे दाखल आहेत. इतर राजकीय व्यक्तिंविरोधातही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने राजकीय द्वेषातून ही कारवाई झाल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. त्यामुळे बडगुजरांना बजावलेली नोटीस मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. कायद्याच्या चौकटीत राहून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन पोलिस आयुक्त कर्णिक यांनी शिष्टमंडळास दिले. याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते, नितीन भोसले, माजी नगरसेवक गजानन शेलार, डी. जी. सूर्यवंशी, संजय चव्हाण आदी उपस्थित होते.

हेही वाचा –