Nashik News : त्या लाचखोर ग्रामसेवकाचे निलंबन

लाचखोर ग्रामसेवकाचे निलंबन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– ठेकेदाराने केलेल्या कामाच्या देयकाची रक्कम मंजूर करण्यासाठी एक लाख चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या वाढोलीच्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले होते. जिल्हा परिषद प्रशासनाने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

ठेकेदाराने केलेल्या कामाच्या देयकाची रक्कम ग्रामपंचायतीकडून मंजूर करण्यासाठी वाढोलीच्या ग्रामसेवकाने त्याच्याकडे लाचेची मागणी केली होती. ही रक्कम संशयित ग्रामसेवक अनिलकुमार मनोहर सुपे (४६) याने नाशिक शहरात स्वीकारली असता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून त्यास जाळ्यात घेतले होते.

हेही वाचा :

  1. Nashik News : कोरोनाच्या नवीन व्हेरीएंटच्या धोक्याने जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सतर्क
  2. मराठी वेब सीरिजचे जग मंदावले; ओटीटीवर थंड प्रतिसाद
  3. ऑस्ट्रेलियात बनत आहे पहिला मानव ‘ब्रेन-स्केल’ कॉम्प्युटर

The post Nashik News : त्या लाचखोर ग्रामसेवकाचे निलंबन appeared first on पुढारी.