Nashik Railway : इगतपुरी रेल्वेस्थानकात आजपासून 32 गाड्यांना कमर्शिअल थांबा

रेल्वे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मध्य रेल्वेने इगतपुरी रेल्वेस्थानकात 32 मेल-एक्सप्रेस गाड्यांना आजपासून (दि.22) कमर्शिअंल थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना आता इगतपुरी रेल्वेस्थानकातून तिकिट बुकींग देखील करता येणार आहे.

इगतपुरी स्थानकातून मुंबई, ठाणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, पुणे, नाशिक, नागपूर शहरांना जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे.यामुळे या प्रवाशांच्या सोयीसाठी 12109-10 सीएसएमटी – मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्सप्रेस, 12111-12सीएसएमटी- नांदेड – सीएसएमटी राज्यराणी एक्सप्रेस, 15017-18-एलटीटी- गोरखपुर-एलटीटी काशी एक्सप्रेस,12071-72 जालना-सीएसएमटी – जालना जनशताब्दी एक्सप्रेस, 12139-40सीएसएमटी – नागपूर -सीएसएमटी सेवाग्राम एक्सप्रेस,12859-60हावडा- सीएसएमटी-हावडा गीतांजली एक्सप्रेस, 12809-10 सीएसएमटी-हावडा- सीएसएमटी मेल, 11401-02 आदिलाबाद -सीएसएमटी – आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस,17087-88सीएसएमटी- सिकंदराबाद -सीएसएमटी – देवगिरी एक्सप्रेस,11071-72-वाराणसी- मुंबई- वाराणसी कामयानी एक्सप्रेस, 22177-78वाराणसी- सीएसएमटी – वाराणसी महानगरी एक्सप्रेस, 12335-36लोकमान्य टिळक टर्मिनस -भागलपूर एक्सप्रेस, 12533-34सीएसएमटी – लखनऊ पुष्पक एक्सप्रेस, 11025-25भुसावळ-पुणे एक्सप्रेस, 18020-30लोकमान्य टिळक टर्मिनस – शालिमार एक्सप्रेस, 22183लोकमान्य टिळक टर्मिनस – अयोध्या एक्सप्रेस आणि 20103लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस या गाड्यांना दोन ते पाच मिनिटांचा थांबा दिला आहे.

हेही वाचा:

The post Nashik Railway : इगतपुरी रेल्वेस्थानकात आजपासून 32 गाड्यांना कमर्शिअल थांबा appeared first on पुढारी.