NCP Crisis : आमदार नितीन पवार यांच्यापुढे तालुक्यात पक्ष पुनर्बांधणीचे आव्हान

आमदार नितीन पवार,www.pudhari.news

कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

मुंबई येथे झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वंतत्र बैठकांमध्ये कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी अजित पवार यांच्या बैठकीस तर कळवण तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थित राहणे पसंद केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये घडलेल्या या राजकीय हालचालीनंतर आता कळवण तालुक्यातील अनेक पदाधिकारी जरी अजित पवार यांच्या बाजूने असले तरी शरद पवार यांना समर्थन देणारा गट ही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर कळवण तालुक्यातील आपली पकड आणखी मजबूत करण्याचे आणि पक्ष पुर्नर्बांधणीचे मोठे आव्हान आमदार नितीन पवार यांच्यासमोर उभे टाकले आहे. राष्ट्रवादीत पडलेल्या या दोन गटांमुळे तालुक्यातील राजकारण मात्र ढवळून निघणार यात शंका नाही.  (NCP Crisis)

शिंदे सरकारच्या काळात कळवण मतदार संघातील विकास खुंटला होता. तर, महाविकास आघाडी सरकारने मतदार संघातील मंजूर विकास कामांना स्थगिती दिली होती. कोटयावधी रुपयाचे प्रस्ताव शासनस्तरावर प्रस्तावित आहे. या प्रस्तावना शासनाची प्रशाकीय मान्यतांसह निधीची तरतूद व कळवण सुरगाणा मतदार संघाच्या विकासाचा मुद्दा लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय कळवण सुरगाणा आमदार नितीन पवार यांनी घेतला व ते अजित पवार  यांच्या बैठकीला उपस्थित राहणे त्यांनी पसंत केले. (NCP Crisis)

कळवण सुरगाणा विधानसभा मतदार संघातून मला उमेदवारी देताना अजित पवार यांनी महत्वाची भूमिका बजावली असून आमची भावकी असल्याचे आमदार नितीन पवार सांगतात. कळवण नगरपंचायतीला मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळे नगरध्यक्ष कौतिक पगार व नगसेवक यांनी अजित पवार यांना समर्थन दिले आहे. कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार व संचालक मंडळातील सदस्य अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष संदीप पाटील, विलास रौंदळ, जयदीप पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुक्यातील तयार झालेल्या या दोन गटांमुळे तालुक्यातील राजकरण चांगलेच ढवळून निघणार आहे. येणाऱ्या काळात आमदार नितीन पवार यांना मतदार संघातील आपली ताकद वाढवून पक्ष पुनर्बांधणी करण्याचे आव्हान राहणार आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या अंतर्गतवादामुळे राष्ट्रवादी कॉंगेसचे माजी शहराध्यक्ष जितेंद्र पगार,  राष्टवादी कॉग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संदीप वाघ यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत यांच्या त्यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.

हेही वाचा : 

The post NCP Crisis : आमदार नितीन पवार यांच्यापुढे तालुक्यात पक्ष पुनर्बांधणीचे आव्हान appeared first on पुढारी.