Viral audio clip : त्या ऑडिओ क्लिप’मुऴे गिरीश महाजनांच्या अडचणी वाढणार?

गिरीश महाजन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, त्यात जिल्हा परिषद भरतीबाबत महाजन हे विद्यार्थ्यासोबत अर्वाच्य भाषेत बोलताना ऐकू येत आहे. या क्लिपच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही, पण यामुळे महाजन अडचणीत येण्याची शक्यता आहे.

बुलडाणा येथील एका विद्यार्थ्याने जिल्हा परिषदेच्या जागेसाठी लवकर परीक्षा घेण्याची मागणी ना. गिरीश महाजन यांच्याकडे फोनवरून संवाद साधताना केली होती. व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये एक विद्यार्थी गिरीश महाजन यांना फोन करून सांगतो, ‘झेडपीची फाइल तुमच्याकडे आली असून, ती पाठवा ना साहेब. मुलं खूप डिप्रेशनमध्ये आहेत.’ त्यावर समोरील व्यक्ती,  ना. महाजन असल्याचा आरोप केला जात आहे, ते म्हणतात, ‘तुम्हाला काही कामं नाहीत का रे ? दिवसरातून 500 फोन लावता, मी काही करत नाही, ती रद्द झाली, असं म्हणताहेत.’ त्यावर समोरचा मुलगा म्हणतो, ‘अहो साहेब, मुलं डिप्रेशनमध्ये आहेत.’ त्यावर पुन्हा समोरून, ‘रद्द केली ती भरती. ठेव फोन.’ असे बोलणारी व्यक्ती ही ना. गिरीश महाजन असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

लवकरात लवकर भरती करावी :

दरम्यान, राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या तब्बल 13 हजार जागांसाठी भरती झाली नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. या जागांसाठी 2019 नंतर एकदाही भरती न झाल्याने 20 लाख अर्ज प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ही परीक्षा होऊन भरती लवकरात लवकर करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

हेही वाचा :

The post Viral audio clip : त्या ऑडिओ क्लिप'मुऴे गिरीश महाजनांच्या अडचणी वाढणार? appeared first on पुढारी.