पिंपळसोंडचे प्रा.तुळशीराम खोटरे निवडणूक रिंगणात

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : एकिकडे देश महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत असतांना देशातील काही गावांमध्ये अजून रस्ता, आरोग्य, शिक्षण, दळणवळण व्यवस्था, शेती, सिंचन, पिण्याचे पाणी या मुलभूत समस्यांसाठी झगडाव लागत आहे. यामध्ये काहीतरी परिवर्तन, बदल घडवून आणण्यासाठी स्वतः शिवाय पर्याय नाही म्हणून उच्च विद्याविभूषित प्रा. तुळशीराम खोटरे  दिंडोरी लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टी पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून अनुसूचित जमाती राखीव प्रवर्गात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

बहूजन समाज पार्टी महाराष्ट्रात स्वबळावर लोकसभा लढवीत आहे. अर्ज दाखल करतेवेळी बसपा प्रदेश महासचिव तायडे, जिल्हा अध्यक्ष अरुण काळे, धर्मराज लालचंद सिरसाट, मछिंद्र अहिरे, आप्पा केदारे, सुरज अहिरे, पोल्स अहिरे, महादेव नाथभजंन आदी बसपा राज्य कार्यकर्ते तसेच नाशिक जिल्हा समिती कळवण, पेठ, दिंडोरी, येवला, सुरगाणा, नांदगाव, निफाड, चांदवड, दिंडोरी लोकसभेतील प्रमुख पदधिकारी उपस्थित होते.

प्रा. खोटरे हे भारत युवा महासंघ, एस. एफ. आय, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, भारतीय आदिवासी दलित पँथर, आदिवासी बचाव अभियान, शाहू, फुले, आंबेडकर, बिरसा सामाजिक संघटना तसेच चळवळीत सहभागी होत अग्रेसर राहून लढा दिला आहे. उच्च शिक्षित असल्याने आदिवासी समाज तसेच शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उमेदवारी करीत असल्याचे सांगितले.

शेतकरी कांदा प्रश्न, भाजीपाला, धान, फळबाग, कांदा निर्यात बंदी, पिक कर्ज माफी, आदिवासी समाजातील बोगस घुसखोरी, पेसा कायदा प्रभावी अंमलबजावणी करणे, जूनी पेन्शन योजना, आदिवासी विभागातील भ्रष्टाचार, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी टंचाई, महिलांचे आरोग्य, बेरोजगारी, कुपोषण, खाजगीकरण, राज्य घटनेतील पाचवी व सहावी अनुसूची लागू करावी, मराठा समाजाला कायम टिकणारे आरक्षण लागू करावे, रेल्वे थांबा, मालेगाव, नांदगाव, येवला, निफाड या तालुक्याच्या शेती सिंचन योजना राबविण्यासाठी मी उमेदवारी करीत आहे. प्रा. खोटरे यांनी तालुक्यात आरोग्य, शिक्षण, दळणवळण, वीज, शेती सिंचन प्रकल्प, रेशन कार्ड आदी कामे करून गोरगरिबांना न्याय मिळवून दिला आहे. नवीन युवा नेतृत्वाला निश्चितच भरघोस प्रतिसाद मिळत मतदारसंघात मते मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा