अंबडला अंधाराचा फायदा घेत कामगारांना लुटायचे, चौघे पोलिसांच्या जाळ्यात

arrested

सिडको : पुढारी वृत्तसेवा- अंबड औद्योगिक वसाहती मध्ये काम करून रात्रीचे वेळेस घरी जात असलेल्या कामगारांना अंधाराचा फायदा घेवून रस्त्यात अडवून त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांचेकडील मोबाईल चोरी झाल्याच्या घटना एमआयडीसी, चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत घडल्या होत्या. चुंचाळे पोलिस चौकीचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी तपास सुरू करून सापळा रचून लुटमार करणारे संशायित चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून साडेतीन लाख रुपये किमतीचे तीस महागडे मोबाईल जप्त केले आहे.

अंबड औद्योगिक वसाहती मध्ये काम करून रात्रीचे वेळेस घरी जात असलेल्या कामगारांना अंधाराचा फायदा घेवून रस्त्यात अडवून त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांचेकडील मोबाईल चोरी तसेच त्याच्या कडे असलेले रक्कम हिसकावून घेत असल्याच्या घटना वाढल्या होत्या. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त मोनिका राउत, सहायक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख  यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक संदिप पवार, पोलिस उप निरीक्षक अतुल पाटील, पोलिस उप निरीक्षक संदिप शेवाळे व पथकाने शोध सुरु केला. या चोरांचा शोध घेत असताना त्यांचे नाव व ठाव ठिकाण्याबाबत गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस चौकीचे पोलीस शिपाई अनिल कु-हाडे यांना मिळाली. या नंतर पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी मंगेश उर्फ मंग्या अंकुश पवार वय २४ वर्षे, कुणाल रविंद्र पगार वय २४ वर्षे, निलेश उर्फ निल्या देवीदास खरे वय २२ वर्षे, कुणाल यादव जाधव वय २४ वर्षे सर्व राहणार चुंचाळे यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली. पोलिसांनी या चार ही संशयित चोरट्या कडून एकुण ३,५४,००० रूपये किमतीचे तीस मोबाईल तसेच चाकु आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आली आहे .

सदरची यशस्वी कामगिरी चुंचाळे पोलिस चौकीचे वरिष्ट पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे .गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक संदिप पवार, पोलिस उप निरीक्षक अतुल पाटील, पोलिस उप निरीक्षक संदिप शेवाळे सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुगले, पोलिस हवालदार समाधान चव्हाण, अनिल कु-हाडे, सुरेश जाधव, श्रीकांत सुर्यवंशी, अर्जुन कांदळकर, दिनेश नेहे, जनार्दन ढाकणे आदीनी केली आहे .

The post अंबडला अंधाराचा फायदा घेत कामगारांना लुटायचे, चौघे पोलिसांच्या जाळ्यात appeared first on पुढारी.