अखेर सर्पदंश लस मागणीची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल

सर्पदंश www.pudhari.news

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्पदंशाचे औषध मिळत नसल्याच्या तक्रारीची दखल घेट पंतप्रधान कार्यालयाने घेत याबाबत सचिवांकडे विचारणा केली आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात संर्पदंशाने मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असल्याने ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्पदंशावरील लस उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील पांगरी येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण पांगारकर यांनी थेट पंतप्रधान कायर्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या पत्राची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने कार्यवाहीसाठी राज्याच्या सामान्य प्रशासन उपसचिव रोशनी कदम पत्र पाठवले आहे. विभागाच्या पाटील यांना सर्पदंशाचे प्रमाण शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक असून, सर्पदंशावरील लशी जिल्हा रुग्णालयामध्ये उपलब्ध असतात. परिणामी सर्पदंश झालेल्या रुग्णाला शहरात नेईपर्यंत वेळेचा अपव्यय होऊन त्याचा मृत्यू ओढवतो. पांगारकर यांनी पंतप्रधानांशी पत्रव्यवहार करून ही बाब अधोरेखित केली होती.

ज्वलंत प्रश्नावर आंदोलनही केले
सर्पदंशावरील लशी ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपलब्ध व्हाव्यात यासाठी पांगारकर यांनी पांगरी येथील संत हरिबाबा समाधी मंदिरात उपोषण केले होते. विभागीय आयुक्तांनी याबाबत दखल घेऊन संबंधितांना निर्देश दिलेले असतानाच आत्ता पंतप्रधान कार्यालयानेदेखील याची दखल घेतली असून, पुढील कार्यवाहीसाठी उपसचिवांना पत्र पाठवत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा: