तलवारीसह फोटो पोस्ट करणं भोवलं

Nashik Crime

नाशिक : ‘ए बच्चे के खेलने की चीज नही, हात कट जाये तो खून निकल आता है’ असा डायलॉग ठेवून तलवार, गुप्तीसह स्वत:चा फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल करणाऱ्या परप्रांतिय युवकास गुंडाविरोधी पथकाने पकडले आहे. दीपक रंगीलाल यादव (१९, रा. सातपूर अंबड लिंकरोड, मुळ रा. उत्तरप्रदेश) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.

पथकातील अंमलदार प्रदिप ठाकरे यांना मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने संशयित दीपक यास पकडले. दीपक हा संजीव नगर परिसरातील एका दुकानात मजूर म्हणून काम करत असून त्यास पथकाने पकडून त्याच्याविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दीपककडून तलवार व गुप्ती जप्त केली आहे. गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार मलंग गुंजाळ, दादाजी पवार, राजेश सावकार, सुनील आडके, ठाकरे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा :

The post तलवारीसह फोटो पोस्ट करणं भोवलं appeared first on पुढारी.