तलाठी भरती परिक्षेची एसआयटीतर्फे चौकशीची मागणी

तलाठी भरती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महसूल विभागातर्फे तलाठी भरती परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक तक्रारी पुढे येत आहे. तलाठी भरती परीक्षेतील नॉर्मलायझेशनची प्रक्रिया सदोष असल्याचा दावा करत या परीक्षेची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करण्याची मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीमार्फत करण्यात आली आहे.

तब्बल ४ हजार ४६६ जागांसाठी राज्यभरात एकूण ५७ सत्रात परीक्षा घेण्यात आली होती. टीसीएस कंपनीमार्फत ८ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल ५ जानेवारीला जाहीर करण्यात आला. परीक्षेत एका उमेदवाराला २०० पैकी २१४ गुण मिळाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया वादात सापडली असून, या परीक्षेची एसआयटी चौकशी करण्याची मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीमार्फत करण्यात येत आहे.

दरम्यान, तलाठी भरती परीक्षा वादात सापडल्याने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या परीक्षेच्या एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणाचे योग्य ते पुरावे सादर केल्यास परीक्षेची चौकशी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

गुण जाहीर करा

सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन एसआयटीमार्फत चौकशी करावी. तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटरवर पेपर दिला आहे आणि यांचे गुण किती आहेत हे सर्वांना समजावे. या परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे, अशी मागणी संघटनेमार्फत करण्यात आली

हेही वाचा :

The post तलाठी भरती परिक्षेची एसआयटीतर्फे चौकशीची मागणी appeared first on पुढारी.