अभिनंदन! बारावीचा निकाल; विभागात मुलीच हुश्शार

12th Result 2024

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. बोर्डाने पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर केली. विद्यार्थ्यांना दुपारी 1 पासून बोर्डाच्या वेबसाइटवर निकाल बघता आला. नाशिक विभागाचा निकाल यंदा ९४.७१ टक्के लागला असून नऊ विभागात नाशिक दुसऱ्या स्थानी आहे. विशेष म्हणजे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. विभागात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.३२ टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.३९ टक्के एवढे आहे.

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत बारावीच्या परीक्षेसाठी यंदा १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांच्या वतीने नोंदणी करण्यात आली होती. परीक्षा मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती.

नाशिक विभागात एकूण एक लाख ५८ हजार १७३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी एक लाख ५७ हजार ३४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी एक लाख ४९ हजार २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये ८० हजार ७७८ मुले, तर ६८ हजार २५१ मुलींची संख्या आहे.

शाखानिहाय निकाल
विज्ञान : ९८.७४ टक्के
वाणिज्य : ९५.२१ टक्के
आयटीआय : ९४.०१ टक्के
कला : ८८.१३ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम : ८८.६२ टक्के

विभागनिहाय निकाल
कोकण : ९७.५१ टक्के
नाशिक : ९४.७१ टक्के
पुणे : ९४.४४ टक्के
कोल्हापूर : ९४.२४ टक्के
छत्रपती संभाजीनगर : ९४.०८ टक्के
नागपूर : ९३.१२ टक्के
अमरावती : ९३ टक्के
लातूर : ९२.३६ टक्के
मुंबई : ९१.९५ टक्के

हेही वाचा: