अभिनेता गोविंदा त्र्यंबकराजा चरणी लीन

गोविंदा

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा-अभिनेता गोविंदा याने मंगळवारी (दि. ९) सायंकाळी गुढीपाडव्याचे औचित्य साधत त्र्यंबकराजाची पूजा अभिषेक करत दर्शन घेतले. गोविंदा हा यापूर्वी अनेकदा त्र्यंबकला आला आहे. मात्र शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर तो प्रथमच त्र्यंबकराजाच्या द्वारी आला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शिंदे गट शिवसेना प्रचाराची धुरा त्याच्यावर आहे. यासाठी त्र्यंबकराजाचे आशीर्वाद लाभावे म्हणून त्याने येथे हजेरी लावली अशी चर्चा होती. त्याच्यासोबत मुलगा यश व मोठे बंधू कीर्ती उपस्थित होते. देवस्थानतर्फे ट्रस्ट अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश नितीन जीवने यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विश्वस्त कैलास घुले, रूपाली भुतडा, पुरुषोत्तम कडलग, सत्यप्रिय शुक्ल, स्वप्निल शेलार आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post अभिनेता गोविंदा त्र्यंबकराजा चरणी लीन appeared first on पुढारी.