देवळाली कॅम्प(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असून, नाशिक तालुक्यातील लहवित येथे राहणाऱ्या १६ वर्षीय तेजस विठ्ठल आहेर याचे अशाप्रकारे झालेले निधन सर्वांना हळहळ लाऊन गेले. तेजस हा आपल्या कुटूंबियांसमवेत सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास खेळत होता. अचानक चक्कर येऊन पडल्याने त्याला तातडीने दवाखान्यात नेले जात असताना असतानांच त्याचे निधन झाले.
तेजस याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. भविष्यात त्याला माहिती व तंत्रज्ञान अभियंता व्हायचेय असे तो कायम बोलत असे. त्याला तीन दिवसांपासून छातीत व पोटात जळजळ होत असल्याचा त्रास होत होता. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यास स्थानिक डॉक्टरकडे उपचारासाठी नेले होते. दोन दिवस औषधोपचार केल्याने त्यास थोडे बरे वाटत होते मात्र काल रात्री आपल्या कुटुंबियांसमवेत टीव्ही पाहण्याबरोबर खेळात मग्न असलेल्या तेजस यास अचानक पोटात त्रास जाणवू लागला. त्यातून काही कळायच्या आत त्यास हृदयविकाराचा धक्का बसला. त्यास उपचारासाठी देवळालीतील खाजगी रुग्णालयात नेले. तेथून बिटको रुग्णालयात तपासणी केली असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.
सहसा ३0 वर्षांच्या पुढे वय असलेल्या नागरिकांमध्ये हृदयविकाराच्या घटना पहायला मिळतात मात्र अवघ्या १६ वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन होण्याची ही धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तेजसचे वडील हे शेती करत असून त्याच्या पश्चात आई, वडील, एक बहीण, चुलते असा परिवार आहे.
हेही वाचा :
- पनवेलकरांना दुहेरी मालमत्ता करातून मुक्त करणार! : उद्धव ठाकरेंची ग्वाही
- ग्रंथालयांची आर्थिक चणचण थांबेना; तुटपुंज्या अनुदानात ग्रंथालयांचा खर्च भागेना
- अस्वच्छ टाक्यांतून; अशुद्ध पाणीपुरवठा : नागरिकांच्या आरोग्याला धोका
The post अवघ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू appeared first on पुढारी.