इगतपुरीत भरदिवसा बिबट्याचा थरार, पाच ते सहा वनरक्षक हल्ल्यात जखमी

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा- इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन परिसरामध्ये एका बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एका अकरा वर्षे वयाच्या युवकावरती या बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर शुक्रवारी (दि.10) सकाळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पिंजरा लावण्यासाठी गेले असतांना या  नरभक्षक बिबट्याने रेस्क्यू सुरू असताना पाच ते सहा वनरक्षकांवरती हल्ला केला. तसेच परिसरातील तीन नागरिक असे जवळपास दहा जण हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

सर्व जखमींना तात्काळ घोटी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा –