नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएमची पहिली रॅन्डमायझेशन प्रक्रिया सोमवारी (दि. १५) पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना पाचारण केले जाणार आहे. या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम विधानसभा मतदारसंघांना हस्तांतरित करण्यात येतील, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली.
लोकसभेच्या रणसंग्रामास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरीकरिता दि. २० मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. धुळे-मालेगाव मतदारसंघाकरिता चौथ्या टप्प्यात मतदान पार पडेल. त्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी प्रत्येकी पाच हजार ७६० कंट्रोल व बॅलेट युनिट्स तसेच ६२३८ व्हीव्हीपॅट मशीन्सचे रॅन्डमायझेशन केले जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांतील स्ट्रॉंगरूममध्ये ही यंत्रे सुरक्षितरीत्या ठेवली जातील.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गेल्या वर्षी जिल्ह्यासाठी ईव्हीएम प्राप्त झाले. या मशीन्सची प्राथमिक तपासणी दि. १० ऑगस्ट २०२३ ला पूर्ण झाल्यानंतर ती सय्यद पिंप्री येथील गोदामात सुरक्षित ठेवण्यात आली होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या यंत्रांचे रॅन्डमायझेशन केले जाईल. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या दालनात सकाळी ११ ला ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दि. २१ एप्रिलपर्यंत त्या-त्या विधानसभा मतदारसंघाच्या अधिकाऱ्यांकडे ते हस्तांतरित करण्यात येतील.
ईव्हीएमची संख्या
मतदारसंघ कंट्रोल युनिट बिट व्हीव्हीपॅट
मालेगाव मध्य ४१२ ४१२ ४४६
मालेगाव बाह्य ४०४ ४०४ ४३८
बागलाण ३४६ ३४६ ३७४
नांदगाव ३९७ ३९७ ४३०
कळवण ४१४ ४१४ ४४९
चांदवड ३५५ ३५५ ३८५
येवला ३८४ ३८४ ४१६
निफाड ३२८ ३२८ ३५५
दिंडोरी ४२८ ४२८ ४६१
सिन्नर ३८५ ३८५ ४१७
नाशिक पूर्व ३९१ ३९१ ४२४
नाशिक मध्य ३५४ ३५४ ३८४
नाशिक पश्चिम ४९२ ४९२ ५३३
देवळाली ३२३ ३२३ ३५०
इगतपुरी ३४७ ३४७ ३७६
एकूण ५७६० ५७६०
The post ईव्हीएमचे येत्या १५ ला रॅन्डमायझेशन, निवडणूक शाखेकडून मशीन्सचे हस्तांतरण appeared first on पुढारी.