ओबीसी आरक्षणासंदर्भातील महामेळाव्यासाठी पिंपळनेरात बैठक

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा ; धुळे येथे ओबीसी आरक्षण अधिकार संदर्भात होणाऱ्या महामेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी पिंपळनेर येथील श्री मुरलीधर मंदिरात ओबीसी समाज घटकांसमवेत नियोजन बैठक घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघाचे विभागीय प्रसिद्धीप्रमुख राजेंद्र गवळी होते. या संदर्भात तैलिक समाजाचे व समता परिषदेचे पांडुरंग सूर्यवंशी यांच्याकडे लेखी पत्र दिले. या बैठकीत समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल यांनी उपस्थित ओबीसी समाज घटकाला मार्गदर्शन करून मोठ्या संख्येने धुळे येथे होणाऱ्या महामेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले की 27 टक्के ओबीसीसाठी असलेले आरक्षण टिकवण्यासाठीची ही अस्तित्वाची लढाई असल्याचे सांगितले.आरक्षण भीक नाही अधिकार आहे,असे ठणकवून सांगत 27 टक्के आरक्षणात 4400 पेक्षा अधिक जाती समाविष्ट आहेत.ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे अशी आमची आग्रही मागणी असून जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी यावेळी बोलून दाखवली.

हे सर्व जातीतील लोक कर भरतात मग सारथी आणि भारती या संस्थेला कोट्यावधी रुपये अनुदान कसे दिले जाते?आणि महाज्योतीला तुटपुंजी मदत केली जाते, हा भेदभाव का ? असा सवाल उपस्थित करीत भुजबळांच्या सोबत रहा,पुढच्या पिढीसाठी हा लढा असून हीच वेळ आहे, समाज जागृती करण्याची एकत्र येण्याची व संघटन करण्याची सर्व समाज अध्यक्षांनी एकत्र येऊन समाजात संघटन उभे करा,समता परिषदेचे ना. भुजबळांचे हात बळकट करू हा लढा लढायचा आहे,ही केवळ माळ्याची तेलींची लढाई नव्हे तर एकूण 400 जातीच्या समाजाच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे सांगितले.दबाव गट निर्माण करून 22 तारखेला एकत्र या व सांख्यिकी दर्शन घडवा हीच ताकद आपल्याला आपल्या अस्तित्व टिकवून ठेवणार असल्याचे शेवटी सांगितले याप्रसंगी अध्यक्ष भाषणात अखिल भारतीय माळी महासंघाचे राजेंद्र गवळी यांनी आपल्याला इतरांच्या आरक्षणात लुडबुड करायची नाही ओबीसींसाठी दिलेले 27 टक्के आरक्षण हे कायम ठेवून ज्यांची मागणी आहे अशा समाजामध्ये ही गरीब लोक आहेत त्यांच्यासाठीही शासनाने वेगळे स्वतंत्र आरक्षण द्यावे असे संबोधित केले.मंत्री.छगन भुजबळ यांची समता परिषदेच्या मार्फत ओबीसींचे आरक्षण टिकवण्याचा जो लढा सुरू केला आहे,तो केवळ एका माळी समाजासाठी नव्हे तर इतरही चारशे जातीचा समावेश आहे,असे सांगून ता. 22 ऑक्टोबर रोजी परिषदेचे संस्थापक ना छगन भुजबळ,बाळासाहेब कर्डक व दिलीप खैरे यांच्या उपस्थितीत धुळे येथे होणाऱ्या महामेळाव्यास ओबीसी समाज घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

या बैठकीत माजी पंचायत समिती सदस्य पी.एस. पाटील,तेली समाज अध्यक्ष पांडुरंग सूर्यवंशी,तालुका अध्यक्ष रवींद्र खैरनार,माजी तालुकाध्यक्ष प्रकाश शिरसाट,सुभाष नेरकर,मुरलीधर मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र पगारे,डॉ.गुलाब पगारे, गिरीश पगारे,कांतीलाल माळी,प्रकाश पगारे,अरविंद शिरसाट,गोविंदराव सोनवणे, योगेश शिरसाठ,चेतन क्षीरसागर,राकेश सोनवणे,विजय मोगरे,रवींद्र सोनवणे,राकेश शेवाळे,सुरेश नहिरे,रवींद्र खैरनार,निंबा एखंडे, शिवा जिरे पाटील, चेतन पगारे,आकाश पगारे, रिंकू सोनवणे,सुरेश बागुल, रामकृष्ण मोगरे,यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश शिरसाठ यांनी केले.

The post ओबीसी आरक्षणासंदर्भातील महामेळाव्यासाठी पिंपळनेरात बैठक appeared first on पुढारी.