बिबट्याची धास्ती; मॉर्निंग-इव्हिनिंग वॉक बंद

बिबट्या

गंगापूर रोड : पुढारी वृत्तसेवा; नाशिकमधील सिरीन मिडोज, काळे मळा, सोमेश्वर या परिसरात गेल्या तीन आठवड्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार दिसून आल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे. परिसरातील अनेकांना बिबट्या वरील परिसरात दिसत असल्याने नागरिकांनी सकाळी व संध्याकाळी फिरणे बंद केले आहे. लहान मुलांनाही पालकांनी सोसायटी गार्डनमध्ये खेळण्यासाठी पाठवणे बंद केले आहे. याबाबत वनविभागाशी संपर्क साधला असता, बिबट्या नदी पलीकडे गेल्याचा रिपोर्ट त्यांच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याचे अधिकाऱ्यांना कळविले असता, हा बिबट्या तिथला स्थानिक आहे, असे अजब उत्तर त्यांच्याकडून दिले गेले. शहरी भागामध्ये बिबट्या चुकून येतो, त्यामुळे शहरी भागामध्ये पिंजरा लावत नसल्याचे त्यांनी सांगितले. या उत्तरामुळे नागरिकांमध्ये संभ्रम अन भीती निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांनी या परिसरामध्ये जनजागृती सभा घेऊ, असे सांगितले आहे. मात्र त्यापेक्षा वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा :

The post बिबट्याची धास्ती; मॉर्निंग-इव्हिनिंग वॉक बंद appeared first on पुढारी.