बेवारस वृद्धेस काही क्षण मिळाली ओळख

जिल्हा रुग्णालय नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; कागदपत्रांची अदलाबदल झाल्याने बेवारस मृत वृद्धेस काही वेळ का असेना ओळख मिळाली होती. मात्र ही चूक लक्षात आल्यानंतर पुन्हा मृत वृद्धेची ओळख बेवारस म्हणून झाल्याचा प्रकार जिल्हा शासकीय रुग्णालयात घडला.

नाशिकरोड बसस्थानकात ६५ वर्षीय वृद्धेस शुक्रवारी (दि.३) दुपारी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. या वृद्धेची ओळख पटलेली नव्हती. दरम्यान, वृद्धेचा उपचारादरम्यान, रविवारी (दि.५) सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णालयाने पोलिसांकडे वृद्धेच्या मृत्यूची नोंदीस सुरुवात केली. यासाठी कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे महिलेचे नाव व कागदपत्रे सोपवले. त्यानुसार पोलिसांनी महिलेच्या मृत्यूची नोंद केली. मात्र काही वेळानंतर ज्या महिला रुग्णाच्या नावे मृत्यूची नोंद झाली त्या नावाची रुग्ण जीवंत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पुन्हा नवीन कागदपत्रे तयार करीत मृत वृद्धेची नोंद बेवारस म्हणून केल्याचे सुत्रांनी सागितले. बेवारस वृद्धेस ज्या महिलेचे नाव दिले होते तिच्यावर जिल्हा रुग्णालयातच उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे.

रुग्णालयात उपचारादरम्यान, वृद्धेचा मृत्यू झाला. दरम्यान, कागदपत्रांची अदलाबदल झाल्याने बेवारस वृद्धेस दुसऱ्या रुग्णाचे नाव लागले. मात्र हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यात दुरुस्ती केली. याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

– डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय.

हेही वाचा :

The post बेवारस वृद्धेस काही क्षण मिळाली ओळख appeared first on पुढारी.