खासगी संगणक चालकावर एसीबीची कारवाई

गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वस्त धान्य दुकानातील रेशन सुरु करुन देण्याच्या नावाखाली एक हजार रुपयांची लाच स्वीकारणारा खासगी संगणक चालकावर एसीबीने कारवाई केली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, शरद रुंजा आढाव (40) हा सिन्नर तहसील कार्यालयात खासगी संगणक चालक असून, तक्रारदाराने रेशन पुन्हा सुरु करण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज दिला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने आढाव यांनी तक्रारदाराकडे धान्य पुन्हा सुरु करून देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आढाव यांस रंगेहाथ पकडले. याबाबत सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस करत आहे.

The post खासगी संगणक चालकावर एसीबीची कारवाई appeared first on पुढारी.