नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गांजाचा साठा करून त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले. यश उर्फ बाज्या पाटील (२५, रा. अंबड लिंकरोड) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे १२ किलो वजनाचा गांजा जप्त केला.
युनिट एकचे हवालदार विशाल काठे यांना यशने अंमली पदार्थाचा साठा केल्याचे समजले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सोमवारी (दि. ८) सापळा रचला. पोलिसांनी यशच्या घराची झडती घेतली, त्यात एक लाख ४९ हजार ८०० रुपयांचा गांजाचा साठा आढळला. यशचा ताबा घेत त्याच्याविरोधात अंबड पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गांजाचा साठा जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशविरोधात याआधीही अंमली पदार्थाचा साठा केल्याप्रकरणी तसेच जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी अंबड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा –
- कट्यार काळजात घुसली‘नंतर सुबोध भावेचा “संगीत मानापमान”, पहिले पोस्टर आऊट
- पाणी टंचाईचे सावट : पाण्यासाठी टँकरभोवती झुंबड
The post गांजाचा साठा करुन विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला अटक, १२ किलाे गांजा जप्त appeared first on पुढारी.