घरात साठवून ठेवला लाखो रुपयांचा गुटखा, गुप्तमाहिती मिळाल्यावर पोलिसांची धाड

गुटखा जप्त www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे शहरातील साक्री रोड भागात गुटख्याची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत सुमारे दोन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला असून एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाल्याची धुळे जिल्हयात विक्री करण्याच्या उद्देशाने तस्करी होत असल्याची माहीती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना सुचना देऊन कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते.

या आदेशानुसार माहिती प्राप्त करीत असतांना पो.नि. दत्तात्रय शिंदे यांना गुप्तबातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, साक्री रोड येथे इसम नामे राकेश भारतलाल रेलन याने त्याचे राहते घरी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत विमल पानमसाला गुटख्याची चोरटी विक्री करण्याचे उद्येशाने साठवणुक केली आहे. खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने पो.नि. दत्तात्रय शिंदे यांनी पथकास कारवाई करण्याचे आदेश केले.

त्यानुसार पथकाने साक्री रोडवर राकेश भारतलाल रेलन याचे राहते घरी गेले असता त्याने सहमती दर्शविल्याने घराची पाहणी केली असता, घरामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत विमल पानमसाला व तंबाखु मिळुन आली. या कारवाईत २ लाख ९ हजार ३१६ रु. किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२८ सह अन्न सुरक्षा मानके कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post घरात साठवून ठेवला लाखो रुपयांचा गुटखा, गुप्तमाहिती मिळाल्यावर पोलिसांची धाड appeared first on पुढारी.