मतदान केंद्र परिसरात आगळीक करणाऱ्या जमावा विरोधात दंगलीचा गुन्हा

धुळे पुढारी वृत्तसेवा; धुळ्यातील शाळा क्रमांक नऊ मध्ये मतदान यंत्राचा फोटो काढल्यानंतर धावपळ झाली. यात झालेल्या दगडफेक प्रकरणात आता जमावाच्या विरोधात दंगल आणि सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आज पोलीस दलाने संवेदनशील भागांमधून रूट मार्च काढून जनतेला शांतता राखण्याचे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले. धुळे लोकसभेसाठी सर्व सहा मतदारसंघांमध्ये …

Continue Reading मतदान केंद्र परिसरात आगळीक करणाऱ्या जमावा विरोधात दंगलीचा गुन्हा

स्वीप उपक्रमातंर्गत आयोजित ‘वोट कर धुळेकर’ महारॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

धुळे : पुढारी वृत्तसेवा- येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रत्येकाने आपले कुटूंब, शेजारी, नातेवाईक यांना मतदान करण्यास प्रेरीत करुन मतदार दूत म्हणून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी अवघ्या धुळेकरांना केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत स्वीप अंतर्गत विविध उपक्रम …

Continue Reading स्वीप उपक्रमातंर्गत आयोजित ‘वोट कर धुळेकर’ महारॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञान हाच जीवनाचा व व्यक्तिमत्व विकासाचा पाया : प्रा.डॉ.सतीश मस्के

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाच्या बळावरच देशाचा कायापालट केला. त्याप्रमाणेच विद्यार्थ्यांनीही ज्ञानाच्या माध्यमातूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणायला हवा असे प्रतिपादन प्रा.डॉ.सतीश मस्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्म.आ.मा.पाटील वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.के.डी.कदम हे होते. यावेळी विचार मंचावर वस्तीगृह अधीक्षक राजेंद्र शिंपी हे होते. पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीच्या मातोश्री सीताबाई चंदनमल जैन …

The post ज्ञान हाच जीवनाचा व व्यक्तिमत्व विकासाचा पाया : प्रा.डॉ.सतीश मस्के appeared first on पुढारी.

Continue Reading ज्ञान हाच जीवनाचा व व्यक्तिमत्व विकासाचा पाया : प्रा.डॉ.सतीश मस्के

14 एप्रिलला निश्चित केलेल्या मार्गाव्यतिरिक्त अन्य मार्गाने मिरवणुका नेण्यास मनाई

धुळे : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात १३ ते १५ एप्रिल २०२४ या कालावधीत कोणत्याही मिरवणुका ठरविलेल्या मार्गाव्यतिरिक्त अन्य मार्गाने नेण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यात १४ एप्रिल २०२४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होईल. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून मुंबई पोलिस …

The post 14 एप्रिलला निश्चित केलेल्या मार्गाव्यतिरिक्त अन्य मार्गाने मिरवणुका नेण्यास मनाई appeared first on पुढारी.

Continue Reading 14 एप्रिलला निश्चित केलेल्या मार्गाव्यतिरिक्त अन्य मार्गाने मिरवणुका नेण्यास मनाई

मोहगावचे लोकनियुक्त सरपंच अपात्र, अतिक्रमण भोवले

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा– साक्री तालुक्यातील मोहगाव येथील शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याने लोकनियुक्त सरपंच यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले आहे. आदिवासी पश्चिम पट्ट्यातील मोहगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लक्ष्मण महाले हे सन 2022 मध्ये थेट जनतेतून लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले होते. निवडणूक लढवतांना निवडणूक अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात सत्य माहिती द्यावी लागते. मात्र सरपंच लक्ष्मण हौशा महाले …

The post मोहगावचे लोकनियुक्त सरपंच अपात्र, अतिक्रमण भोवले appeared first on पुढारी.

Continue Reading मोहगावचे लोकनियुक्त सरपंच अपात्र, अतिक्रमण भोवले

धुळ्यात उन्हाचा तडाखा वाढला, 41 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यान्वित

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे जिल्ह्यातील 41 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी दिली आहे. जिल्ह्यात अचानक उन्हाचा तडाखा वाढल्याने आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 डिग्री सेल्सीअसच्या वर गेल्याने दुपारच्या वेळी उन्हाचे चटके बसत असून त्याचा शरीरावर …

The post धुळ्यात उन्हाचा तडाखा वाढला, 41 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यान्वित appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात उन्हाचा तडाखा वाढला, 41 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यान्वित

बनावट कागदपत्रांच्या आधारे लाटला शिक्षकाचा पगार, सहा जणांविरोधात गुन्हा

धुळे : पुढारी वृत्तसेवा- शहरातील एका उर्दू शाळेतून बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने शिक्षकाचा पगार लाटून शासकीय पैशांचा अपहार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या गैरप्रकाराची संबंधित शिक्षण विभागातील अधिकाऱ्याकडे तक्रार करूनदेखील त्याची दखल घेतली गेली नाही. अलहेरा उर्दू शाळेत शिक्षक सेवेत कायम नसतानाही खोटे कागदपत्रे जोडून पगार काढण्यात आला. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते …

The post बनावट कागदपत्रांच्या आधारे लाटला शिक्षकाचा पगार, सहा जणांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading बनावट कागदपत्रांच्या आधारे लाटला शिक्षकाचा पगार, सहा जणांविरोधात गुन्हा

घरात साठवून ठेवला लाखो रुपयांचा गुटखा, गुप्तमाहिती मिळाल्यावर पोलिसांची धाड

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे शहरातील साक्री रोड भागात गुटख्याची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत सुमारे दोन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला असून एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाल्याची धुळे जिल्हयात विक्री करण्याच्या उद्देशाने तस्करी होत असल्याची माहीती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली. …

The post घरात साठवून ठेवला लाखो रुपयांचा गुटखा, गुप्तमाहिती मिळाल्यावर पोलिसांची धाड appeared first on पुढारी.

Continue Reading घरात साठवून ठेवला लाखो रुपयांचा गुटखा, गुप्तमाहिती मिळाल्यावर पोलिसांची धाड

पांझराकान साखर कारखाना वाचविण्यासाठी आम्ही जनतेसोबत : डॉ. तुळशीराम गावित यांची ग्वाही

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- साक्री तालुक्यातील पांझराकान सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी आमचे शासकीय पातळीवर प्रयत्न सुरु असून, कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही तालुक्यातील जनतेबरोबर राहू, अशी ग्वाही डॉ. तुळशीराम गावित यांनी दिली. भाडणे येथील पांझराकान साखर कारखाना बचाव समितीच्या वतीने साक्री येथे बुधवारी शेतकरी, कामगारांची संयुक्त बैठक ना.बु,छात्रालयाच्या जे.यु ठाकरे सभागृहात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ.तुळशीराम गावित …

The post पांझराकान साखर कारखाना वाचविण्यासाठी आम्ही जनतेसोबत : डॉ. तुळशीराम गावित यांची ग्वाही appeared first on पुढारी.

Continue Reading पांझराकान साखर कारखाना वाचविण्यासाठी आम्ही जनतेसोबत : डॉ. तुळशीराम गावित यांची ग्वाही

आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती करुन घ्यावी : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

धुळे : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहे. याबाबत सर्वांनी माहिती करुन घ्यावी व या तत्वांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार …

The post आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती करुन घ्यावी : जिल्हाधिकारी अभिनव गोयल appeared first on पुढारी.

Continue Reading आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती करुन घ्यावी : जिल्हाधिकारी अभिनव गोयल