चांदवड (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – स्वयंपाक करताना गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट होऊन संपूर्ण दुकान जळून खाक झाल्याची घटना मंगरूळ शिवारात घडली.
टोल नाक्याजवळील अग्निशमन दलाच्या बंबांनी आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. मंगरूळ गाव शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावरील गायकवाड वस्ती येथे दुचाकी, चारचाकी वाहनांचे पंक्चर काढण्याचे दुकान आहे. दुकानात मोहम्मद खुर्शीद हे रविवारी (दि. ९) दुपारी स्वयंपाक करत असताना अचानक सिलिंडरने पेट घेतला. आग बघता बघता संपूर्ण दुकानात पसरली. स्थानिकांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र भडका उडाल्याने प्रयत्न अपुरे पडले. सोमा टोलवेज कंपनीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत दुकान जळून मोठे आर्थिक नुकसान झाले होते.
हेही वाचा: