चांदवडला एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात, 5 ते 6 जणांचा मृत्यू

ACCIDENT pudhari.news

नाशिक – मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड जवळ भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. चांदवड जवळील राऊड घाटात एसटी बस आणि ट्रक यांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. तर 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज (दि.30) सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.