
जळगाव: पुढारी वृत्तसेवा: राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज आपल्या नवीन दालनातून कामाचा शुभारंभ केला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जलजीवन मिशनच्या माध्यमातून राज्यातील जनतेला शुध्द पाणी पुरवठा करण्याच्या संकल्पाची पूर्तता करण्याला आपले प्राधान्य राहणार असल्याचे प्रतिपादनकेले. आधीच्या सरकारमध्ये याच खात्याची जबाबदारी आपण अतिशय समर्थपणे पार पाडली असून आता जुन्याच सहकाऱ्यांच्या मदतीने नवीन आव्हान देखील समर्थपणे पेलणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज आपल्या नवीन दालनाचे उद्घाटन केले. याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे आदींची उपस्थिती होती. पाटील यांच्या हस्ते फित कापून दालनाचे उद्घाटन झाल्यानंतर येथून त्यांनी कामकाजास प्रारंभ केला.
याप्रसंगी मंत्री पाटील म्हणाले की, मला लागोपाठ दुसऱ्यांदा या खात्याची धुरा मिळाली आहे. राज्यातील प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या घरापर्यंत पिण्याचे शुध्द पाणी पोहोचवण्याचा संकल्प हा जलजीवन मिशन माध्यमातून करण्यात आलेला आहे. या संकल्पाच्या पूर्ततेसाठी आम्ही आजवर खूप मेहनत घेतली आहे. आता २०२४ पर्यंत जलजीवन मिशन पूर्ण करायचे असल्याने आम्ही नव्या दमाने कामाला लागलो आहोत. जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन निकषानुसार दरडोई ५५ लीटर निकषानुसार पाणी पुरवठा करण्याला आपले प्राधान्य राहणार असल्याचेही पाटील यांनी याप्रसंगी सांगितले .
हेही वाचलंत का ?
- शिवसेना-शिंदेसेनेमध्ये ‘माना’चा तंटा! निर्णयाचा चेंडू पोलिसांच्या कोर्टात; मुंबईनंतर नगरमध्ये शिंदेसेना आक्रमक
- Encounter in Anantnag : अनंतनागमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
- राज्यातील सत्तासंघर्षावर लवकरच सुनावणी : बुधवारी घटनापीठ स्थापन करण्याचे आदेश
The post जलजीवन मिशनची पूर्तता हाच संकल्प : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.