
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जुने सीबीएस येथे गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांच्या गळ्यातील व पिशवीतील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या संशयित महिलेस पोलिसांनी पकडले आहे. संशयित महिला मराठवाड्यातील असून, तिच्याकडून तीन महिलांचे चोरलेले सुमारे सव्वा लाखाचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
वर्षा भोसले (रा. सिल्लोड) असे पकडलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. चंदा आहेर (६५, रा. हेडगेवार चौक, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, त्या रविवारी (दि.१७) सकाळी १०.३०च्या सुमारास कळवणला जाण्यासाठी जुने सीबीएस येथे आल्या होत्या. त्यावेळी बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र महिलेने ओढले. मात्र सावध असलेल्या चंदा यांना त्याची जाणीव होताच त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे नागरिकांनी संशयित महिलेस पकडले. बसस्थानक परिसरातच गस्तीवरील पोलिसांनी महिलेचा ताबा घेत चौकशी केली. त्यावेळी तिने त्याच बसमधील आणखी दोन महिलांच्या सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. यात शीतल न्याहारकर यांचे १५ हजारांचे मंगळसूत्र व उज्ज्वला बस्ते यांचे ७० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र संशयित महिलेने चोरले होते. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- Nandurbar politics | नेत्यांच्या पक्षांतराने नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीला झटके; राजकीय समीकरणात मोठे बदल
- New Marathi Serials : ‘नवरी मिळे हिटलरला’ आणि ‘पुन्हा कर्तव्य आहे’ आजपासून
The post जुने सीबीएस येथे प्रवाशांचे दागिने चोरणारी महिला गजाआड, सव्वा लाखाचे दागिने हस्तगत appeared first on पुढारी.