डॉ. पवार यांची एक्स हँडलवरील पोस्ट, मतदारांना केले आवाहन

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क –  लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्यात नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी मतदार संघात सकाळपासून मतदान करण्याला प्राधान्य देत मतदान केंद्रावर ७ पासून हजेरी लावली.  नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, अपक्ष शांतिगीरी महाराज आणि वंचीत बहुजन आघाडीचे करण गायकर यांच्यासह ३१ उमेदवार रिंगणात आहे. तर दिंडोरीला महायुतीच्या वतीने केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यासह १० जण उमेदवार मैदानात आहेत.

दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांनी दळवट येथे आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला असून त्यांनी याबाबत त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर आपली मतदानाची पोस्ट टाकत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.