तारवालानगरला तीन लाखांची घरफोडी

घरफोडी

नाशिक : तारवालानगर येथील लामखेडे मळा परिसरात चोरट्याने घरफोडी करून तीन लाख तीन हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व मोबाइल चोरून नेला. प्रशांत ठाकरे (५२) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने बुधवारी (दि.२०) दुपारी घरफोडी करून दागिने व मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला आहे.

महिला प्रवाशांचे दागिने लंपास

नाशिक : नवीन मेळा व नाशिक रोड बसस्थानक परिसरातून चोरट्यांनी महिला प्रवाशांकडील सोन्याचे दागिने चोरून नेले. मोहिनी मोरे या प्रवासी महिलेच्या फिर्यादीनुसार, त्या देवकाबाई नवरे (६७, दाेघे रा. मेरी म्हसरूळ लिंक रोड) यांच्यासह रविवारी (दि.१७) सकाळी नऊच्या सुमारास नवीन मेळा बसस्थानकातून मालेगाव येथे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत ४७ हजार रुपयांचे दागिने चोरले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. तर पूजा बोडके (रा. ता. सिन्नर) यांच्या फिर्यादीनुसार, त्या बुधवारी (दि.२०) दुपारी नाशिक रोड बसस्थानकात बसमध्ये चढत असताना चोरट्याने त्यांच्या पर्समधून ४८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौळाणे रोडवर घरफोडी

नाशिक : गौळाणे रोडवर चोरट्याने घरफोडी करून ४९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, रोकड व इतर चीजवस्तू चोरल्या आहेत. हरीश लोणे (३६) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने मंगळवारी (दि.१९) दिवसा घरफोडी करून घरातील दागिने, २८ हजार रुपयांची रोकड व इतर ऐवज चोरला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post तारवालानगरला तीन लाखांची घरफोडी appeared first on पुढारी.