रमजानचा पहिला खंड पूर्ण, दुसऱ्या खंडाची सुरुवात

रमजान दुसरा खंड सुरु,www.pudhari.news
जूने नाशिक: पुढारी वृत्तसेवा- पवित्र रमजान महिना सुरू होऊन गुरुवारी दहा दिवस अर्थात दहा रोजे पूर्ण झाले आहेत. मात्र, या महिन्यात रात्री पठण केली जाणार्‍या विशेष नमाजला (तरावीहला) बुधवारीच दहा दिवस पूर्ण झाले होते. या दहा दिवसांच्या काळालाच अशरा (टप्पा) म्हटले जाते. रमजान महिन्यात प्रत्येक दहा दिवसांचा कालावधी हा एक अशरा मानला जातो. यानुसार गुरुवारी सायंकाळी अशरा-ए-मगफिरतला प्रारंभ झाला असून अशरा-ए-रहमतची सांगता झाल्याने दुसऱ्या खंडाची सुरुवात झाली आहे.  (Ramadan 2024)
पहिले दहा दिवसांमध्ये वृद्धांसह तरूण व लहान मुले मशिदीत होणाऱ्या नमाज पठणात मोठय़ा प्रमाणात सहभाग होता. रमजान महिना हा दहा दहा दिवसांच्या कालावधी नुसार तीन खंडात विभागलेला असतो. इस्लाम धर्मात रमजान महिन्याचे तीन भाग पाडलेले आहेत. त्याप्रमाणे दहा दिवसांना अशरा म्हटले जाते. पहिला अशरा रेहमत (कृपा), दुसरा अशरा मगफीरत (माफी) आणि तिसरा अशरा जहन्नम (नर्क) पासून निजात (सुटका) मानण्यात येते. याप्रमाणे मुस्लिम बांधव या तिन्ही अशरांत इबादत करून शेवटच्या अशरामध्ये गोरगरीब नातेवाईक, अनाथ तसेच विधवांना जकात आणि सदका (दानधर्म) वाटप करतात.

तराविह ची विशेष नमाज (Ramadan 2024)

रमजान महिन्याची सुरूवात होताच रात्री 8.30 च्या इशाच्या नमाजनंतर तरावीहच्या विशेष नमाजला सुरुवात होते. रात्री 10.30 च्या नंतर तरावीहची नमाज संपते. यामध्ये मनिभरात संपूर्ण कुरान पठण करण्याची परंपरा असुन रोज कुरान मधील तीस पैकी दीड ते दोन पारे प्रमाणे नमाजे तरावीह पठण करण्यात येत आहे.

हेही वाचा :

The post रमजानचा पहिला खंड पूर्ण, दुसऱ्या खंडाची सुरुवात appeared first on पुढारी.