नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ‘तुमचे क्रेडिट कार्ड सुरू करून देतो’ असे सांगून भामट्याने शहरातील तिघांना ऑनलाइन पद्धतीने ८ लाख ५२ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी बाळासाहेब जाधव (५७, रा. गुलमोहोर कॉलनी, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाधव यांच्यासह इतर दोघांना भामट्यांनी फोन केला होता. राष्ट्रीयकृत बॅंकांचे नाव सांगून भामट्यांनी त्यांना क्रेडिट कार्ड बंद असल्याचे सांगितले. क्रेडिट कार्ड सुरू करणे गरजेचे असून, त्याचा भविष्यात फायदा होईल. क्रेडिट कार्ड वापरल्यास मोठ्या प्रमाणात ‘कॅश बॅक’ मिळतात, रिवॉर्ड पॉइंटही मिळतात. त्यासाठी आम्ही सांगू त्या पद्धतीने मोबाइलवर ॲप सुरू करा, असे भामट्यांनी तिघांना सांगितले होते. त्यामुळे तिघांनीही क्रेडिट कार्ड सुरू करण्यास संमती देत भामट्यांनी सांगितल्यानुसार ॲप सुरू केले. भामट्यांनी तिघांच्या बँक खात्यांची व क्रेडिट कार्डची माहिती घेतली. त्यानंतर भामट्यांनी तिघांच्या बँक खात्यांतून आर्थिक व्यवहार केले. तसेच तिघांच्या मोबाइलवर आलेले ओटीपीही भामट्यांनी मिळवले. त्याआधारे भामट्यांनी तिघांच्या बँक खात्यातून परस्पर ८ लाख ५२ हजार रुपये काढून गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलिस अधिक तपास करीत आहे.
हेही वाचा :
- बीड : माजलगाव येथील व्यापार्याची ३२ लाखाची फसवणूक; गुन्हा दाखल
- Maha Shivratri 2024: आकर्षक फुलांच्या सजावटीने खुलणार त्र्यंबकराजाचा साज
- Maha Shivratri 2024 : औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त जय्यत तयारी; आज मध्यरात्री होणार महापूजा
The post 'तुमचे क्रेडिट कार्ड सुरू करून देतो' सांगून तिघांना 8 लाखांचा गंडा appeared first on पुढारी.