दारणात पोहताना पतीचा पत्नीदेखत बुडून मृत्यू

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – तालुक्यातील बोर्ली वाघ्याची वाडी येथील दारणा नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या पती-पत्नीपैकी पतीचा पोहताना बुडून मृत्यू झाला. इगतपुरी पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. शुक्रवारी दुपारी बोर्ली वाघ्याची वाडी येथील दारणा नदीपात्रात पुनाजी नामा वीर (४५) हे पत्नी सखुबाई (३८) हिच्यासह अंघोळीसाठी दारणा नदीकाठावर आले होते. यावेळी पुनाजी पोहत असताना खोल पाण्याकडे गेले. परंतु तेथे दम लागून ते बुडाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असून, पुढील तपास सुरू केला आहे. गेल्या आठवड्यात भावली धरणात पाच, तर वैतरणा धरणात बुडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे.

हेही वाचा: