नाशिक : पुढारी वृत्तसेवा-लाेकसभा निवडणूकीची रणधुमाळीस प्रारंभ झाला असताना दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार काेण असणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे पक्षांतर्गत इच्छुकांच्या आशा आजही पल्लवीत असून, या उमेदवारांकडून मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर जोर दिला जात आहे. (Dindori Lok Sabha 2024)
देशातील लोकशाहीच्या सर्वात माेठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणूकांचा शंखनाद झाला आहे. पहिल्या टप्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रीयेच प्रारंभ झाला आहे. राजकीय वातावरण तापू लागले आहे. मात्र, एकीकडे अर्ज भरण्याची लगबग सुरु असताना पाचव्या टप्यातील दिंडाेरी लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम आहे. महायुतीकडून विद्यमान खा. भारती पवार यांना पुनश्च उमेदवारी घोषित झाली असताना प्रतिस्पर्धी शरद पवार गटात अद्यापही शांतता पाहायला मिळते आहे. (Dindori Lok Sabha 2024)
महाविकास आघाडीत दिंडोरी मतदारसंघावर शरद पवार गटाचे वर्चस्व आहे. निफाडच्या सभेत खुद्द मोठ्या पवारांनीच उमेदवार देणार असल्याचे जाहिर केल्याने आघाडीतील कॉग्रेस व शिवसेना ठाकरे गटाच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. त्यातच जागेवरील दाव्यानंतर पवार गट तातडीने या ठिकाणी उमेदवार देईल, अशी चर्चा होती. प्रत्यक्षात मात्र निवडणूका घोषित होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला असताना पवार गटाचा उमेदवार ठरलेला नाही. खुद्द खा. पवारच याबाबतचा निर्णय घेतील, असे पक्षाचे स्थानिक नेते सांगत आहेत. एकुण मतदारसंघाचा आवाका बघता तसेच प्रचारासाठीचा कालावधी विचारात घेता इच्छूक पायाला भिंगरी लावून मतदारापर्यंत पोहचण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहेत.
नाशिकचा सस्पेन्स कायम
मध्यंतरीच्या काळात दिंडोरीप्रमाणे नाशिकची जागा पक्षाला सोडावी अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली. त्यासाठी आघाडीत मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटाला रायगडची जागा देऊ केली गेली. परंतू, ठाकरे गटाने आधीपासूनच निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. पण त्यांचाही उमेदवार ठरलेला नाही. त्यामुळे नाशिकच्या जागेचा सस्पेंन्स कायम असून आघाडीत एैनवेळी जागांची अदलाबदल होऊ शकते, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
कार्यकर्त्यांमध्ये दावे-प्रतिदावे
दिंडोरीत शरद पवार गटाकडून चार ते पाच इच्छूक आहेत. हे सर्वजण विविध तालूक्यांतील असून त्यांच्या पॉकेटमध्ये ते मात्तबर आहेत. त्यामुळे पक्षाकडून आपल्याच माणसाला उमेदवारी मिळणार असे दावे-प्रतिदावे कार्यकर्ते करत आहेत. निवडून येण्याच्या दृष्टीने गोळाबेरीज करुन हे कार्यकर्ते प्रचारालादेखील लागले आहे. परंतू, पक्ष कोणाच्या पारड्यात उमेदवारीचे दान टाकणार हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा –
- Kangana Ranaut-Urmila Matondkar : ‘उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पोर्न स्टार…’; कंगनाचा जुना व्हिडिओ व्हायरल
- Crime News : गुटख्याचा साठा जप्त : पिकअपसह 31 लाखांचा मुद्देमाल ताब्यात
- Afghan Women | विवाहबाह्य संबंध ठेवल्यास महिलांना दगडाने ठेचून मारू; तालिबान्यांचा फतवा, ऑडिओ क्लीप व्हायरल
The post दिंडोरीत शरद पवार गटाचे ठरेना, उमेदवारी गुलदस्त्यात; इच्छुकांचे गुफ्तगू appeared first on पुढारी.