नाशिक : अवैध गॅस भरणा केंद्रावर विशेष पथकाचा छापा

पोलिसांचा छापा

नाशिक : कांदळवाडा (ता. इगतपुरी) येथील अवैध गॅस भरणा केंद्रावर ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शुक्रवारी (दि. २८) छापा टाकून 1.75 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.

विशेष पथक इगतपुरी भागात गस्तीवर असताना धम्मगिरी विपश्यना केंद्राच्या म्यानमार प्रवेशद्वारासमोरील कांदळवाडा येथे अवैध गॅस भरणा केंद्र सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याआधारे छापा टाकून अब्दुल रफिक अब्दुल रेहमान (६५, रा. गांधीनगर, इगतपुरी) हे रिक्षाचालक अलासिस अंबादास स्थुल (५०, रा. शिवनेरी कॉलनी, रेल्वे पॉवर हाउस, इगतपुरी) यांच्या रिक्षा (एमएच १५, एके ६१०२) मध्ये घरगुती गॅस भरताना आढळले. त्यांच्या ताब्यातून रिक्षासह २१ घरगुती वापरचे सिलिंडर, नोझल मशीन व इलेक्ट्रिक मोटार असा १ लाख ८१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलिस नाईक सचिन पिंगळ, नितीन डावखर, धनंजय देशमुख, मनीषा नवले आदींनी सहभाग घेतला.

हेही वाचा : 

The post नाशिक : अवैध गॅस भरणा केंद्रावर विशेष पथकाचा छापा appeared first on पुढारी.