नाशिक : पाहुणा म्हणून आलेल्या युवकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

मुंबईतील कुर्ला येथून आजीकडे पाहुणा म्हणून आलेल्या युवकाने परिसरात खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याचा जाब विचारायला गेलेल्या पीडित मुलीच्या आईलाही संशयिताने जबर मारहाण केल्याची संतापजनक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पंचवटी परिसरातील पाहुणा मुलगा संशयित महेश कौरी हा कुर्ला येथून नाशिकला आला होता. गुरुवारी (दि. २७) रात्री 10 च्या सुमारास घरापुढे खेळणाऱ्या लहान मुलांमधील एका अल्पवयीन मुलीला या संशयिताने तुझा टॉप खूप चांगला आहे. हा टॉप काढून मला दे असे सांगत थेट अल्पवयीन मुलीच्या अंगावरील टॉप खेचण्यास सुरुवात करीत तिच्याशी अंगलट करण्यास सुरुवात करीत तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या मुलीने घरात धाव घेत घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. यावेळी आईने घराबाहेर येत संशयिताला मुलीची छेड काढल्याचा जाब विचारताच संशयिताने थेट पीडितेच्या आईवर हल्ला करीत तिला जबर मारहाण केली.

तसेच संशयितांची आजी, बहीण आणि एका महिलेने येऊन पीडितेच्या आईला अश्लील भाषेत शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याबाबत पीडितेने आणि तिच्या आईने पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेत संशयित महेश कौरीच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पंचवटी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

The post नाशिक : पाहुणा म्हणून आलेल्या युवकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग appeared first on पुढारी.