धुळे : पुढारी वृत्तसेवा – धुळे तालुक्यातील वार शिवारात बनावट दारू तयार करण्याचा कारखाना उध्वस्त करण्यात आला आहे. या कारखान्यामधून सुमारे चार लाख तीस हजार रुपयांचे बनावट मद्य तसेच दारू तयार करण्यासाठीचे मशीन आणि अन्य ऐवज जप्त करण्यात आला असून पोलिसांनी बनावट मद्य तयार करणाऱ्या म्होरक्याचा माग काढण्यास सुरुवात केली आहे.
धुळे तालुक्यातील वार शिवारातील महेंद्र राजाराम चव्हाण यांच्या शेतातील घरात बनावट देशी दारुचा कारखाना असून तेथे बनावट देशी दारु तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती ऋषीकेश रेड्डी यांना मिळाली. त्यानुसार पथकाने संशयित ठिकाणी छापा टाकला. या ठिकाणी बनावट मद्य तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या पथकाने घटनास्थळावरून मानवी शरिरास घातक व अपायकारक अशी बनावट टॅन्गो पंच देशी दारु बनविण्या करिता वापरात असलेले साहित्य ताब्यात घेतले आहे.
यात सुमारे रीकाम्या बाटल्या, 2,लाख रु.कि.चे सिलींग पॅकिंगचे इलेक्टीक मशीन तसेच 50 हजार रु. कि.चे एक लोखंडों व लाकडो मुठांचे सिलीग पैकिंगचे इलेक्ट्रोक मशीन , यासह मध्य तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण-4,30,850 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात धुळे तालुक्यातील वार येथील महेंद्र चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले. बनावट मद्याचा कारखाना नेमका कोणी सुरू केला होता. याबाबत चौकशी सुरू आहे. तसेच पुढील तपासणीत बनावट कारखान्याच्या माध्यमातून बनावट मद्य निवडणुकीच्या काळात कोठे पाठवण्यात आले होते का. याची देखील चौकशी करण्यात येत आहे.