नंदुरबार : तळोदा वसतिगृहात मुलींची हाणामारी; प्रकल्प अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार

मुलींची हाणामारी www.pudhari.news
नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
तळोदा शहरातील आदिवासी विकास विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात मुलींमध्ये बेदम हाणामारी झाल्याची घटना घडली. हाणामारीत एक विद्यार्थिनी जखमी झाली असून, तिला तळोदा येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसात लेखी तक्रार दिली जाणार असल्याचे मुलींच्या पालकांकडून सांगण्यात आले आहे.
वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी काही मुलींना माझ्या मुलीला मारहाण करण्यासाठी दबाव आणला, असा आरोप मारहाण झालेल्या मुलीच्या वडिलांनी केला आहे. चिथवलेल्या त्या मुली कर्मचाऱ्यांच्या सांगण्यानुसार त्रास देतात, यावरून पीडित मुलीचा वाद झाला होता. अशी मुलीच्या वडिलांची तक्रार आहे की, तळोदा शहरातील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात प्रकल्प अधिकारी पाहणीसाठी येतात. त्यावेळी त्यांच्यासोबत कुणीही महिला अधिकारी नसतात. माझ्या मुलीने याबाबत आपल्या भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. यामुळे मारहाण झालेली मुलगी व तिचे वडील प्रकल्प अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलिस यांच्याकडे मुलीला घेऊन गेले होते. परंतु अशा प्रकारे कृती करू नको, यामुळे वसतिगृहाची बदनामी होते, असे वसतिगृहात राहणाऱ्या एका मुलींच्या गटाने व वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला.  मारहाण झालेल्या मुलीसोबत मुलींच्या एका गटाची या विषयावरून बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत झाले.
प्रकल्प अधिकारी कधीही रात्रीच्या सुमारास मुलींच्या वसतिगृहात आलेले नाहीत, याशिवाय ते दुपारी आले असता त्यांनी मुलींच्या वसतिगृहातील महिला गृहपाल व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन वसतिगृहाची पाहणी केली. मुलींचा वाद हा व्यक्तिगत आहे. याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाहक गोवण्याचा प्रयत्न केला जात असून ते अतिशय चुकीचे आहे. – अर्चना जाधव, गृहपाल, शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह, तळोदा.

हेही वाचा:

The post नंदुरबार : तळोदा वसतिगृहात मुलींची हाणामारी; प्रकल्प अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार appeared first on पुढारी.