नऊ लाखांची सोन्याची लगड घेऊन चोर पसार

जळगाव : शहरातील जुने जळगाव भागातील बदाम गल्ली काजल ज्वेलर्स या ठिकाणी असलेल्या बंगाली कारागीर डाय बनवण्यासाठी दिलेली नऊ लाख रुपयांची सोन्याचे लगड घेऊन पसार झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाशीष पंचानंद धारा हे सोने कारागीर असून त्यांनी आपल्या दुकानात रतन तारापदा याला कारागीर म्हणून ठेवले होते. त्याला 162.937 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड बनवण्यासाठी विश्वासाने दिली होती. मात्र संशयित आरोपी रतन याने नऊ लाख रुपयांची (162.937) ग्रॅम वजनाची लगड घेऊन तो पसार झाला. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहे.

 एक लाखाच्या मोटरसायकल चोरीला

 जिल्ह्यातील जामनेर, जळगाव शहर व एमआयडीसी परिसरातून एक लाख पाच हजार रुपयांच्या तीन मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी लांबवल्या. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील शिंगायत येथील शेतकरी राजू तुळशीराम न्हावी हे जामनेर येथे बस स्थानक परिसरात मोटरसायकल लावली असता त्यांची पंधरा हजार रुपयाची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लांबवली. जळगाव शहरातील तहसील कार्यालय समोरील एम जे अँड सन्स दुकानाजवळ 36 परलाद धांडे यांनी त्यांची वीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल लावली असता अज्ञात चोरट्याने लांबवली. जळगांव येथील एमआयडीसी भागातील रायपूर कुसुंबा येथील दिलीप रघुनाथ सोनवणे यांची 70 हजार रुपयाची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने घरासमोरून लांबवली. जिल्ह्यात तसेच शहरात दिवसेंदिवस मोटरसायकली चोरीचे प्रमाण वाढत आहे मात्र यामागील मुख्य सूत्रधार कोण हे अजूनही पोलीस प्रशासन उघडण्यात अपयशी ठरलेले आहेत.

हेही वाचा :

The post नऊ लाखांची सोन्याची लगड घेऊन चोर पसार appeared first on पुढारी.